30 ऑक्टोबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज: संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात पाऊस खूपच कमी, तापमान सामान्यापेक्षा अधिक

October 29, 2018 8:59 PM | Skymet Weather Team


संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पाऊस खूपच कमी राहिलेला आहे.

खरेतर कोरड्या वातावरणाला सुरुवात नोव्हेंबर महिन्यापासून होवून ही परिस्थिती साधारण मे महिन्यापर्यंत राहते. या कालावधीत मासिक पर्जन्यमान देखील खूप कमी असते, पण या वर्षी राज्यात तुलनेने कमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

विभागानुसार ही तूट कोंकण-गोव्यात 57%, मध्य महाराष्ट्रात 74%, मराठवाड्यात 87% तर विदर्भात 99% इतकी आहे.

सध्या, दिवसा आणि रात्रीच्या तापमानात फरक देखील खूप जास्त आहे. दुपार अतिशय गरम असून कमाल तापमान 30 अंशाचा वरती आहे तर अंतर्गत भागांवर किमान तापमान 13 ते 16 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. सध्या पूर्वेकडून बंगालच्या खाडीतून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यामुळे दिवसाच्या तापमानात घट अपेक्षित आहे.

दरम्यान , बंगालच्या खाडीवर एक कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे, ज्यामुळे पुढील 2-3 दिवस महाराष्ट्रात पूर्वेकडून वारे येतील ज्यामुळे आर्द्रता थोडी वाढेल आणि गरम हवामानाच्या परिस्थितीतून काही सुटका होईल, अशी आशा आहे.

आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:

मुंबईत कमाल तापमान 35 अंश से. आणि किमान 22 अंश से. असण्याची शक्यता आहे.

नाशिक मध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान 14 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

पुणे येथे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 अंश राहण्याची अपेक्षा आहे.

वर्धा येथे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

अकोला येथे दिवसा तापमान 36 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

नागपूर येथे दिवसा तापमान सुमारे 34 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 16 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

 

OTHER LATEST STORIES