26 ऑक्टोबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज: दक्षिण मध्य-महाराष्ट्र आणि कोकण- गोव्यावर पाऊस, उर्वरित भाग मात्र कोरडेच

October 25, 2018 4:11 PM | Skymet Weather Team


मागील 24 तासांत दक्षिण मध्य-महाराष्ट्र आणि कोकण- गोव्यावर विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात आलेली असून उर्वरित भाग मात्र कोरडेच राहिलेले आहेत.

मुंबईतील कमाल तापमान 2 अंशांनी अधिक आहे ज्यामुळे वातावरणात गर्मी आणि आर्द्रता पसरलेली आहे .सध्या तरी, येणाऱ्या दिवसात अस्वस्थ हवामानाच्या परिस्थितीतून मुंबईकरांची सुटका होण्याची शक्यता नाही. तसेच, कोकण-गोवा, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात देखील दिवसाचे तापमान 2-3 अंश सेल्सिअसने जास्त आहे, याउलट मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमानात २-३ अंशांनी घट दिसून आलेली आहे.

सध्या कोकण किनारपट्टी लगत एक कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे ज्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु 24 तासांनंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणे अपेक्षित आहे.

आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:

मुंबईत अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 37 अंश से. आणि किमान 22 अंश से. असण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीमध्ये अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान 24 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

कोल्हापूर येथे अंशतः ढगाळ आकाशासह पावसाची शक्यता असून कमाल तापमान 33 (tehtis) अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश राहण्याची अपेक्षा आहे.

वर्धा येथे अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

औरंगाबाद येथे अंशतः ढगाळ आकाशासह दिवसा तापमान 34 (chavtees) अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

जळगाव येथे दिवसा तापमान सुमारे 36 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 16 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

 

OTHER LATEST STORIES