Skymet weather

25 ऑक्टोबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज: 180 तालुक्यात दुष्काळ घोषित, दिवसाचे तापमान सामान्य पेक्षा अधिक

October 24, 2018 6:57 PM |


संपूर्ण राज्यात आतापर्यंत तुलनेने कमी पाऊस पडलेला असून, महाराष्ट्र शासनाने जवळपास 180 तालुक्यात दुष्काळ सदृश घोषित केले आहे.

ऑक्टोबरमध्ये बऱ्यांच भागात सामान्य पेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मराठवाड्या वर तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली तर सोलापूरमध्ये गेल्या 24 तासांत हलका पाऊस अनुभवण्यात आला. याउलट मात्र विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दिवसाचे तापमान सामान्य पेक्षा अधिक आहे.

तथापि, दक्षिण कर्नाटक ते उत्तर मध्य महाराष्ट्रा दरम्यान एक कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे, ज्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

तसेच येत्या काही दिवसात, पुण्यासह, दक्षिण कोकण आणि गोवा तसेच उत्तर मध्य-महाराष्ट्रावर तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार मराठवाड्यावर पावसाचा जोर किंचित वाढेल परंतु विदर्भातील हवामान मात्र कोरडे आणि उष्णच राहणार .तसेच 26 ऑक्टोबर पासून पावसाचा जोर पुन्हा कमी होणार.

आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:

मुंबईत अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 34 अंश से. आणि किमान 22 अंश से असण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीमध्ये अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान 23 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर येथे अंशतः ढगाळ आकाशासह पावसाची शक्यता असून कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश राहण्याची अपेक्षा आहे

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.Rain in India

वर्धा येथे अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

औरंगाबाद येथे अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता असून दिवसा तापमान 34 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

जळगाव येथे दिवसा तापमान सुमारे 36 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 17 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try