राज्यात ऑक्टोंबर महिन्यात पाऊस तुलनेने खूप कमी पडलेला असून, सध्या सुमारे 80% enshi कमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
मागील 24 तासात मराठवाड्यात तुरळक पावसाची नोंद करण्यात आलेली असून, औरंगाबादमध्ये 3 मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.
दुसरीकडे, विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये तापमान सामान्यपेक्षा 3-4 अंशांनी अधिक आहे. तसेच उत्तर मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाडाच्या भागात दिवसाचे तापमान देखील सामान्यपेक्षा जास्त आहे.
दरम्यान पुढील काही दिवसात मध्य-महाराष्ट्र आणि आसपासच्या मराठवाडा भागावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुढील 24 ते 48 तासांमध्ये दक्षिण मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे कोंकण आणि गोवा येथेही हलक्या पावसाची शक्यता असून , हा पाऊस साधारण 25 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहण्याची अपेक्षा आहे. याशिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तुट किंचित कमी होणार अशी अपेक्षा आहे, परंतु 25 ऑक्टोबर नंतर मात्र हवामान पुन्हा कोरडे होईल. दुसरीकडे, विदर्भातील हवामानात कोणतीही सुधारणा अपेक्षित नाही.
आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:
मुंबईत अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 36 अंश से. आणि किमान 24 अंश से. असण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीमध्ये अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान 23 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर येथे अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता असून कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश राहण्याची अपेक्षा आहे
वर्धा येथे अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.
औरंगाबाद येथे अंशतः ढगाळ आकाशासह दिवसा तापमान 34 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.
जळगाव येथे दिवसा तापमान सुमारे 36 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 19 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.