Skymet weather

19-20 ऑक्टोबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज: महाराष्ट्रातील काही भागात पाऊस, गर्मी पासून दिलासा

October 18, 2018 5:38 PM |


नमस्कार मी भाग्यश्री skymetweather report मध्ये आपले स्वागत आहे.

विजयाश्मी निमिता सर्व प्रीख कन्न हार्डिक शुभचाचा.

मागील २४ तासात महाराष्ट्रातील काही भागात, विशेषतः कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

ताशेच गेल्या काही दिवसांपासून फक्त दक्षिण कोकण आणि गोव्यात पाऊस अनुभवण्यात येत होता परंतु आता उत्तर कोकण- गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. पुण्यासह मुंबईत देखील मेघगर्जनेसह पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. कोकण-गोवा आणि उत्तर मध्य-महाराष्ट्रातील तापमान देखील २-३ अंशांनी कमी झाले आहे.

दरम्यान ,उत्तर कोकण आणि गोव्यावर एक कमकुवत कमी दाबाचा पट्टा विकसित झालेला आहे, ज्यामुळे मध्य-महाराष्ट्र आणि कोकण-गोव्यातील बऱ्याच भागांवर पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. परिणु या विद्यादशमी उत्त्वावर विपरित परानाम आदर नाही.

स्कायमेटच्या अंदाजानुसार,21 आणि 22 ऑक्टोबर रोजी नाशिक, मालेगाव, अहमदनगर आणि उत्तरेकडील जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु पावसाचा जोर कमी राहणार असल्यामुळे गर्मी पासून पूर्ण रूपाने सुटका मिळण्याची अपेक्षा नाही.

आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:

मुंबईत कमाल तापमान 35 अंश से. आणि किमान 26 अंश से. असण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता असून कमाल तापमान 32अंश सेल्सिअस आणि किमान 18 अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे.

पुणे येथे अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता असून कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश राहण्याची अपेक्षा आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.Rain in India

वर्धा येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

अकोला येथे दिवसा तापमान 35 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

नागपूरमध्ये दिवसा तापमान सुमारे 34 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 18 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

live lightning आणि त्यांची सद्य स्थिती तसेच संपूर्ण देशभरातील हवामानाच्या अंदाजासाठी आपण skymetweather.com वर log-on करू शकता तसेच आम्हाला facebook, tweeter आणि instagram वर देखील follow करू शकता.

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try