महाराष्ट्रातील हवामानाच्या परिस्थितीत आतापर्यंत एक महिन्यांत कोणताही बदल झालेला नसून राज्यातील हवामान कोरडे व उबदार राहिले आहे. तसेच नागरिकांची तूर्तास तरी उकाड्यापासून सुटका अपेक्षित नाही.
राज्यातील बहुतेक भागांमध्ये कमाल तापमान सामन्यपेक्षा 2-3 अंशांनी अधिक आहे. दरम्यान, किमान तापमान सामान्यपेक्षा कमी असल्यामुळे रात्री वातावरणात थंडावा आलेला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील २-३ दिवस राज्यावर कुठलीही हवामान विषयक गतीविधी अपेक्षित नसून, १८ ऑक्टोबर रोजी मात्र कोकण आणि गोव्यावर एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे दक्षिण कोकण आणि गोव्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
याउलट, उत्तर महाराष्ट्रात मात्र हवामान उष्ण असेल. तसेच मुंबईत देखील पुढील ३-४ दिवस हवामान उष्ण व दमट राहणार असे दिसत आहे.
आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:
मुंबईत कमाल तापमान 36 अंश से. आणि किमान 22 अंश से. असण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये कमाल 33 (tehtis) अंश सेल्सिअस आणि किमान 16 अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे.
पुणे येथे कमाल तापमान 33 (tehtis) अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश राहण्याची अपेक्षा आहे.
रत्नागिरी येथे ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश असण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर येथे देखील अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता असून, कमाल तापमान 33 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.
वर्धा येथे कमाल तापमान 34 (chavtis) अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.
अकोला येथे दिवसा तापमान 36 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.
औरंगाबाद मध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.
जळगाव येथे कमाल तापमान 35 अंश व किमान तापमान 18 अंश से. राहण्याची अपेक्षा आहे.
नागपूरमध्ये देखील हवामान उष्ण असण्याची शक्यता असून, दिवसा तापमान सुमारे 34 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 19अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.