ऑक्टोबर महिन्याची सुरुवात कोरड्या हवामानाने झाली होती आणि आतापर्यंत राज्यातील हवामान जवळपास कोरडेच राहिलेले आहे. 11 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात सरासरी पेक्षा 79 (ekon enshi) टक्के कमी पावसाची नोंद झालेली आहे.
विभागानुसार पाहिले तर कोकण आणि गोवा येथे सरासरी पेक्षा 64% takke,(chausashta) मध्य-महाराष्ट्रात 69% (ekon sattar) takke, मराठवाड्यात 81%(ekkeyenshi) takke कमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे याउलट, विदर्भ जवळपास कोरडाच राहिलेलें आहे.
दरम्यान पुढील ४-५ दिवस राज्यावर कुठलीही हवामान प्रणाली उपस्थित राहण्याची शक्यता नसून, १७ ऑक्टोबर रोजी मात्र दक्षिण मध्य-महाराष्ट्र व कोकण आणि गोव्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तोपर्यंत राज्यातील वातावरण मात्र कोरडेच राहण्याची अपेक्षा आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान 30 अंशांच्या वर राहील तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल. परिणामी राज्यातल्या बऱ्याच भागांमध्ये थंड आणि आरामदायक हवामान अपेक्षित आहे. तसेच किनारी भागांमध्ये देखील किमान तापमान 25-26 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:
मुंबईत ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 35 (pastis) अंश से. आणि किमान 25 (panchvis) अंश से. असण्याची शक्यता आहे.
'
नाशिकमध्ये अंशतः ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 33 (tehtis) अंश सेल्सिअस आणि किमान 19 (ekonis) अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे.
पुणे येथे अंशतः ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 33 (tehtis) अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 (ekvis) अंश राहण्याची अपेक्षा आहे.
रत्नागिरी येथे अंशतः ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 32 (battis) अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 (panchvis) अंश असण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर येथे देखील अंशतः ,ढगाळ आकाशासह कमाल तापमान 33 (tehtis) अंश सेल्सियस आणि किमान तापमान २० (vees) अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.
वर्धा येथे ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 36 (chattis) अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 (ekvis) अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.
अकोला येथे ढगाळ वातावरणासह दिवसा तापमान 37 (sadtis) अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 20 (vees)अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.
औरंगाबाद मध्ये अंशतः ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान 35 (pastis) अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 (vees) अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.
जळगाव येथे कमाल तापमान 36 (chattis) अंश व किमान तापमान 21 (ekvis) अंश से. राहण्याची अपेक्षा आहे.
नागपूरमध्ये देखील हवामान उष्ण असण्याची शक्यता असून, अंशतः ढगाळ वातारणामुळे दिवसा तापमान सुमारे 34 (chauutis) अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 19 (ekonis) अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.