गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे संपूर्ण राज्यात वातावरण आरामदायी झालेले आहे.
मागील २४ तासांत, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांवर हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तसेच विदर्भातील काही जिल्हयात जोरदार पाऊस झाला आहे. या शिवाय कोकण व गोवा विभागात देखील पाऊस सुरु आहे.
पुढील २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, उत्तर मध्य-महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीसह उत्तरेकडील भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, डहाणू आणि ठाणे याठिकाणी देखील पाऊस अपेक्षित आहे.
[yuzo_related]
स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत उत्तर कोकणात व उत्तर मध्य-महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, नाशिक, जालना याठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस, तर नागपूर, हिंगोली, व औरंगाबाद या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com