महाराष्ट्रातील रहिवाशांची सध्या तरी कोरड्या व गरम हवामानापासून सुटका होण्याची शक्यता नाही. तथापि, कोकण-गोवा आणि मध्य-महाराष्ट्रातील तापमान किंचित कमी झालेले आहे. मुंबईत देखील तापमानात घट नोंदवण्यात आलेली आहे. दरम्यान, विदर्भ आणि आसपासच्या भागातील तापमान ३० अंशापेक्षा जास्त आहे. तथापि, येत्या आठवड्यात राज्यात पावसाची कोणतीही शक्यता दिसत नाही.
चक्रीवादळ तितलीमुळे, बंगालच्या खाडीतून आर्द्र वारे विदर्भ, मराठवाड्यापर्यंत पोहोचत आहेत ज्यामुळे तापमानात घट होवून काही काळ गरमी पासून आराम मिळेल. स्कायमेटच्या अंदाजानुसार 13-14 ऑक्टोबरला चक्रीवादळ कमकुवत होईल. त्यामुळे पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे.
आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:
मुंबईत कमाल तापमान ३४ (chavtis) अंश से. आणि किमान २५ अंश से. असण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये कमाल ३३ (tehtis) अंश सेल्सिअस आणि किमान १७ अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे.
पुणे येथे अंशतः ढगाळ वातावरणासह कमाल तापमान ३३ (tehtis) अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० अंश राहण्याची अपेक्षा आहे.
रत्नागिरी येथे ढगाळ वातावरणासह कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश असण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर येथे देखील अंशतः ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता असून, कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस आणि किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.
वर्धा येथे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९ (ekonis) अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.
अकोला येथे ढगाळ वातावरणासह दिवसा तापमान ३७ (sadtis) अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान १८ (athra) अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.
औरंगाबाद मध्ये अंशतः ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.
जळगाव येथे कमाल तापमान ३७ अंश व किमान तापमान १८ अंश से. राहण्याची अपेक्षा आहे
नागपूरमध्ये देखील हवामान उष्ण असण्याची शक्यता असून, अंशतः ढगाळ वातारणामुळे दिवसा तापमान सुमारे ३५ अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.