[Marathi] 10 ऑक्टोबर- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर मध्ये चांगला पाऊस

October 9, 2017 5:25 PM | Skymet Weather Team

 

गेल्या २४ तासात, महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने अमरावती येथे ३९ मिमी, औरंगाबाद ३७ मिमी, महाबळेश्वर २९ मिमी आणि नाशिकमध्ये १८ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

येत्या काही दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा व उत्तर मध्य-महाराष्ट्रात एक किंवा दोन जोरदार सरींसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

[yuzo_related]

प्रामुख्याने नागपूर, अकोला, औरंगाबाद, जालना, नाशिक, जळगाव, अलिबाग, रत्नागिरी, महाबळेश्वर, हरनाई आणि भिरा सारख्या ठिकाणी उद्या चांगला पाऊस अपेक्षित आहे. असे असले तरी राज्यात सकाळ आणि रात्री आरामदायी असतील.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES