[Marathi] 10 ऑक्टोबर - महाराष्ट्रात उष्ण हवामान, कोकण-गोव्यात हलक्या पावसाची शक्यता

October 9, 2018 5:11 PM | Skymet Weather Team


मॉन्सूनचा हंगाम संपलेला असून राज्यात बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामन्यपेक्षा अधिक नोंदवण्यात येत आहे. किनारी भागांमध्ये देखील परिस्थिती बिकट आहे कारण या भागातील नागरिकांना उच्च तापमानासह उच्च आर्द्रता देखील सहन करावी लागत आहे.

विदर्भ आणि लगतच्या मध्यप्रदेशात उपस्थित असलेल्या चक्रवाती परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कमाल तापमान सामान्यपेक्षा ४ ते ५ अंश अधिक आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ आणि मध्य-महाराष्ट्रात देखील गरम हवामान अनुभवले जात आहे.

तथापि, मुंबईसह कोकण आणि गोवा येथे पुढील 24 तासांत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, गरम हवामानातून सुटका होण्याची शक्यता नाही. चोवीस तासांनंतर मात्र कोकण आणि गोव्यातील हवामान कोरडे होईल. दरम्यान, बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळामुळे 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी विदर्भात आकाश ढगाळ राहण्याची अपेक्षा आहे. परंतु, पावसाची शक्यता खूप कमी आहे.

आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:

मुंबईत, तापमान उष्ण असण्याची शक्यता असून, अंशतः ढगाळ वातारणासह कमाल तापमान 35 अंश से. आणि किमान 25 अंश से. असण्याची शक्यता आहे.

पुणे येथे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सियस राहण्याची अपेक्षा आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

कोल्हापूर येथे कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस आणि किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

वर्धा येथे कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

औरंगाबादमध्ये हवामान उष्ण राहण्याची शक्यता असून कमाल तापमान सुमारे 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

जळगाव येथे निरभ्र आकाश राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 37 अंश व किमान तापमान 20 अंश से. राहण्याची अपेक्षा आहे.

 

OTHER LATEST STORIES