Skymet weather

20 नोव्हेंबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज: केरळ, कर्नाटक, मध्य महाराष्ट्रवर पाऊस; पूर्वोत्तर भारत मात्र कोरडेच

November 19, 2018 7:57 PM |


जर आपण दक्षिण भारतपासून सुरूवात केली तर या वेळी एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण- पश्चिम बंगालच्या खाडीवर बनलेला आहे. ज्यामुळे तमिलनाडु, केरळ आणि कर्नाटकच्या काही भागांवर हलक्या पाऊसाची शक्यता आहे
या भागात किमान तापमान पण सामान्यपेक्षा जास्त राहील.

आता मध्य भारताकडे वडूया, एक ट्रफ रेषा महाराष्ट्रच्या किनारपट्टी जवळून गेली आहे, ज्यामुळे कोंकण -गोवा आणि मध्य महाराष्ट्रावर हलक्या पाऊसाची शक्यता आहे तथापि, गुजरात, दक्षिण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि विदर्भात कोरडे हवामान राहील.

उत्तर भारतात एक पश्चिमी विक्षोभ चा जोर कमी झाल्यामुले काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हवामान कोरडे राहील. किमान तापमानात घट दिसून येईल, मात्र दिवसाचे तापमान अधिक असेल. तसेच दिल्ली-एनसीआर मध्ये प्रदूषणाने काही काळ सुटका मिळेल.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.Rain in India

पर्व भारताबद्दल सांगाईचे तर, बांग्लादेश वर एक चक्रवाती परिस्थिती बनलेली आहे ज्यामुळे असम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हलक्या पाऊसाची शक्यता आहे . याशिवाय संपूर्ण पूर्वोत्तर भारताचे हवामान मात्र कोरडेच राहणार. तसेच, दिवस आणि रात्रीच्या तापमानात काही खास बदल होण्याची शक्यता दिसत नाही आहे.

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try