2 नोव्हेंबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज: महाराष्ट्र सरकारने बुधवारी १५० तालुक्यात दुष्काळ घोषित केले

November 1, 2018 4:32 PM | Skymet Weather Team

नमस्कार मी भाग्यश्री, skymet weather report मध्ये आपले स्वागत आहे

संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात राज्यात कोरडे हवामान अनुभण्यात आले आहे. विशेषतः,उत्तर महाराष्ट्र तसेच उत्तर कोकण-गोवा, या भागांवर पाऊसाची खूप कमी नोंद करण्यात आली ज्यामुळे महाराष्ट्र सरकारने बुधवारी १५० तालुक्यात दुष्काळ ग्रस्त घोषित केले आहे.

सध्या कर्नाटक व उत्तर मध्य महाराष्ट्रावर एक कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे ज्यामुळे ३ व ४ नोव्हेंबरच्या आसपास उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोंकण-गोव्यासह, पुणे नाशिक आणि मुंबईमध्ये हलक्या पाऊसाची शक्यता आहे.

परंतु हा पाऊस क्षणिक असून, संपूर्ण राज्यात हवामान पुन्हा एकदा कोरडे होतील आणि गरम हवामानाची परिस्थिती पुन्हा प्रस्तावित होईल.

दुसरीकडे मराठवाड्यावर हलका पाऊस नोंदवण्यात आला आहे. सध्या हवामानाची परिस्थिती पाहता, येत्या आठवड्यातही विदर्भावर पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.

मुंबईत देखील 18 ऑक्टोबर पासून चांगल्या पाऊसाची नोंद करण्यात आलेली नाही आहे. येणाऱ्या दिवसात हवामानात फार मोठा बदल नसून, हवामान कोरडेच राहणे अपेक्षित आहे.

आता महाराष्ट्राच्या प्रमुख शेहरांच्या तापमानावर नजर टाकूया

मुंबईत कमाल तापमान 36 अंश से. आणि किमान 22 अंश से. असण्याची शक्यता आहे.

नाशिक मध्ये कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान 15 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

पुणे येथे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 16 अंश राहण्याची अपेक्षा आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

वर्धा येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

अकोला येथे दिवसा तापमान 35 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

नागपूर येथे दिवसा तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 18 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

 

OTHER LATEST STORIES