महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती काही प्रमाणात निवळली असली तरी, विदर्भातील काही भागांमध्ये अजूनही उष्णतेची लाट अनुभवण्यात येत आहे. दरम्यान,दक्षिण मध्य-महाराष्ट्र आणि दक्षिण विदर्भाच्या काही भागांत झालेल्या विखुरलेल्या पावसामुळे तापमानात घट नोंदवण्यात आलेली आहे.
मागील २४ तासात, नागपूरमध्ये ३५.८ मि.मी., सातारा येथे ३३ मि.मी., कोल्हापूर ७ मि.मी. आणि वर्धा येथे १.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
स्कायमेट हवामानतद्यांच्या अनुसार, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्र तसेच विदर्भांतील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे पुढील २४-४८ तासात संपूर्ण महाराष्ट्रातून उष्णतेची लाट नाहीशी होण्याची अपेक्षा आहे.
[yuzo_related]
दरम्यान येत्या ३० मे च्या सुमारास महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असून, जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मध्य-महाराष्ट्र आणि कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे.
मुंबई येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सियस आणि किमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 38 अंश सेल्सियस आणि रात्री 25 अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते.
पुणे येथे कमाल 36 अंश सेल्सियस आणि किमान 24 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीत दिवसाचे तापमान 33 अंश सेल्सियस आणि रात्रीचे तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 35 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
वर्धामध्ये कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस असेल तर किमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
अकोला येथे कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस आणि किमान 30 अंश सेल्सियस इतके राहणार आहे.
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.
औरंगाबादमध्ये दिवसा तापमान 40 अंश सेल्सियस आणि रात्री तापमान 25 अंश सेल्सियसच्या आसपास राहील.
जळगाव येथे कमाल तापमान 43 अंश सेल्सियस असेल तर किमान 27 अंश सेल्सियस अपेक्षित आहे.
नागपूर येथे कमाल 43 अंश सेल्सिअस तर किमान 28 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.