[Marathi] नागपूर, पुणे आणि मुंबई येथे उष्णतेची लाट

May 24, 2017 7:20 PM | Skymet Weather Team

 

मध्य-महाराष्ट्राच्या काही भागात व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागात उष्णतेची लाट कायम आहे.
नागपूर, चंद्रपूर, ब्रह्मपुरी, सांगली, सातारा आणि वर्धा जिल्ह्यांतील कमाल तापमान 45 अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे.

येणार्‍या दिवसात मान्सूनपुर्व पावसाची शक्यता नसल्याने पुढील 3 दिवस उष्णतेपासून सुटका मिळण्याची काही चिन्हे नाहीत. तसेच येत्या 24 तासात मराठवाड्यातील बहुतेक भागात विशेषतः लातूर, नांदेड, व परभणी येथे उष्णतेची लाट तीव्र होण्याची / पकड घट्ट करण्याची शक्यता आहे. खरेतर, उष्णता मुंबईच्या राजधानी शहरापर्यंत देखील पोहोचत आहे ज्यामुळे हवामान अस्वस्थ आणि गरम होत आहे.

Live status of Lightning and thunder

तथापि, पुणेकरांसाठी चांगली बातमी आहे, दुपारी किंवा संध्याकाळी मेघगजवनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES