Skymet weather

[Marathi] 23 मे महिना- नागपूर, परभणी, वेंगुर्ला, कोल्हापूरमध्ये पावसाची शक्यता

May 23, 2018 10:06 AM |

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती कायम आहे. विदर्भातील काही भागांत गडगडाटासह पावसाची नोंद झालेली असली तरीही तापमान 45 अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान तापमानात कोणतेही बदल अपेक्षित नसून पाऱ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच एक उत्तर-दक्षिण कमी दाबाचा पट्टा उत्तरप्रदेश पासून दक्षिणेकडे कर्नाटकपर्यंत विस्तारलेला असून विदर्भ आणिमराठवाड्यातून जात आहे.

[yuzo_related]

त्यामुळे पुढील २४ ते ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्राच्या काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण कोकणात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र मुंबईसह उत्तर कोकणात हवामान कोरडेच राहणार आहे.

मुंबई येथे कमाल तापमान 39 अंश सेल्सियस आणि किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सियस आणि रात्री 23 अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते.

पुणे येथे कमाल 36 अंश सेल्सियस आणि किमान 23 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीत दिवसाचे तापमान 32 अंश सेल्सियस आणि रात्रीचे तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 37 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील Rain
वर्धामध्ये कमाल तापमान 46 अंश सेल्सिअस असेल तर किमान 31 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

अकोला येथे कमाल तापमान 46 अंश सेल्सिअस आणि किमान 31 अंश सेल्सियस इतके राहणार आहे.

औरंगाबादमध्ये दिवसा तापमान 41 अंश सेल्सियस आणि रात्री तापमान 26 अंश सेल्सियसच्या आसपास राहील.

जळगाव येथे कमाल तापमान 44 अंश सेल्सियस असेल तर किमान 28 अंश सेल्सियस अपेक्षित आहे.

नागपूर येथे कमाल 46 अंश सेल्सिअस तर किमान 30 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.Rain in India

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try