[Marathi] 18 मे महिना- पुणे, अकोला, सांगली आणि वेंगुर्ल्यात पाऊस

May 18, 2018 12:25 PM | Skymet Weather Team


सोलापूरमध्ये जोरदार तर सांगली व विदर्भातील काही भागांवर मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

एक ट्रफ रेखा विदर्भ आणि मराठवाड्यातून दक्षिणपूर्व मध्यप्रदेश ते तटीय कर्नाटकपर्यंत विस्तारलेली आहे. ज्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार वारा व गडगडाटासह हलका पाऊस अपेक्षित आहे. तसेच दक्षिण मध्य-महाराष्ट्र व दक्षिण कोकणात देखील पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, अकोला आणि वेंगुर्ला या शहरांमध्ये आज गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

[yuzo_related]

उत्तर मध्य-महाराष्ट्रात मात्र हवामान अतिशय उष्ण राहण्याची अपेक्षा आहे, मालेगाव व जळगाव येथे कमाल तापमान सर्वसाधारणपेक्षा अधिकच राहणार. तसेच या भागांमध्ये उष्णतेची लाट सद्र्यश्य स्थिती देखील कायम राहणार आहे.
दरम्यान ढगाळ वातावरणामुळे मुंबईत देखील हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे.

मुंबई येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सियस आणि किमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 38 अंश सेल्सियस आणि रात्री 24 अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते.

पुणे येथे कमाल 38 अंश सेल्सियस आणि किमान 24 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे पाऊस रत्नागिरीत दिवसाचे तापमान 33 अंश सेल्सियस आणि रात्रीचे तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील पाऊस वर्धामध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस असेल तर किमान 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

अकोला येथे कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस आणि किमान 31 अंश सेल्सियस इतके राहणार आहे.

औरंगाबादमध्ये दिवसा तापमान 41 अंश सेल्सियस आणि रात्री तापमान 27 अंश सेल्सियसच्या आसपास राहील.

जळगाव येथे कमाल तापमान 45 अंश सेल्सियस असेल तर किमान 28 अंश सेल्सियस अपेक्षित आहे.

नागपूर येथे कमाल 44 अंश सेल्सिअस तर किमान 29 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

 

OTHER LATEST STORIES