[Marathi] 1 मे महिना- महाराष्ट्रात उष्णतेची परिस्थिती कायम राहणार

May 1, 2018 12:23 PM|

राज्यावर उष्णतेने आपली पकड मजबूत केलेली असून, गेल्या अनेक दिवसांपासून ४५ अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद देखील करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान उष्ण व कोरडेच असून, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील तापमानाचा पारा ४५ अंशांहून अधिक असून वेगाने वाढत आहे.

[yuzo_related]  

तसेच राज्यातील इतर भागांमध्ये देखील कमाल तापमान सामान्यपेक्षा वरच आहे पण मध्य-महाराष्ट्र आणि कोकणातील किमान तापमान मात्र सामान्यच्या जवळपास आहे. शिवाय, सध्या कोणतीही हवामान प्रणाली उपस्थित नसल्यामुळे,महाराष्ट्रातील हवामान उष्ण व कोरडेच राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान पुढील दोन-तीन दिवस विदर्भाच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती कायम राहणार असून, मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती उद्भवू शकते.

मुंबई येथे कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस आणि किमान २५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये दिवसाचे तापमान ३९ अंश सेल्सियस आणि रात्री २२ अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते

पुणे येथे कमाल ३९ अंश सेल्सियस आणि किमान २२ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे

रत्नागिरीत दिवसाचे तापमान ३२ अंश सेल्सियस आणि रात्रीचे तापमान २६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सियस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.Rain in India

वर्धामध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस असेल तर किमान २७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

अकोला येथे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस आणि किमान ३० अंश सेल्सियस इतके राहणार आहे.

औरंगाबादमध्ये दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस आणि रात्री तापमान २६ अंश सेल्सियसच्या आसपास राहील.

जळगाव येथे कमाल तापमान ४३ अंश सेल्सियस असेल तर किमान २७ अंश सेल्सियस अपेक्षित आहे

नागपूर येथे कमाल ४३ अंश सेल्सिअस तर किमान २८ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

Similar Articles