[Marathi] 6 मार्च- महाराष्ट्रात उष्ण हवामान; अकोला, वाशिम, नागपूरमध्ये पावसाची शक्यता

March 8, 2018 7:40 PM | Skymet Weather Team


 

सध्या संपूर्ण महाराष्ट्र उष्ण आणि कोरडे हवामान अनुभवत आहे. खरं तर, विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानाने ३० अंशा पलीकडे मजल मारलेली आहे,  याउलट कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागांमध्ये तापमानात घट झाली आहे.

[yuzo_related]

पुढील आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून, प्रामुख्याने विदर्भात ९ आणि १० मार्च च्या आसपास हलका पाऊस होण्याची शक्यता आहे ज्यामुळे सद्य उष्ण हवामानापासून काही काळ सुटका होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, उर्वरित सर्व विभागांमध्ये हवामान कोरडेच राहील.

मुंबईबद्दल सांगायचे तर, फेब्रुवारीत शहरातील कमाल तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. तथापि, मार्चमध्ये कमाल तापमानात घट नोंदवली आहे. मागील २४ तासात सांताक्रूझ वेधशाळेने ३१.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केलेली आहे.

महाराष्ट्रातील १० शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:

मुंबईत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान 22 अंश सेल्सिअस इतके राहणार आहे.

नाशिक येथे दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सियस आणि रात्रीचे तापमान १६ अंश सेल्सियसच्या आसपास असेल.

पुण्यात कमाल ३६ अंश सेल्सिअस आणि किमान २१ अंश सेल्सिअस राहणे अपेक्षित आहे.

रत्नागिरी येथे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान २३ अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस अपेक्षित आहे.

वर्धामध्ये कमाल तापमान जास्त ३८ अंश सेल्सियस व किमान २१ अंश सेल्सिअस नोंद होण्याची शक्यता आहे.

अकोला येथे तापमान सर्वाधिक म्हणजे ३९ अंश सेल्सिअस आणि किमान २० अंश सेल्सियस च्या आसपास राहणे अपेक्षित आहे.

गरज और वर्षा वाले बादलों की ताज़ा स्थिति जानने के लिए नीचे दिए गए मैप पर क्लिक करें।

औरंगाबाद येथे कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहणे अपेक्षित आहे.

जळगावमध्ये कमाल तापमान ३७ अंश सेल्सियस असेल तर किमान २२ अंश सेल्सियस राहील.

नागपूर येथे कमाल ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८ अंश सेल्सियस नोंदवेले जावू शकते.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES