[Marathi] 23 मार्च- सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे २५ मार्च दरम्यान पावसाची शक्यता

March 22, 2018 5:55 PM | Skymet Weather Team

राज्यात तापमान सामान्य पातळीच्या जवळपास आहे. मात्र उत्तर आणि ईशान्येकडून राज्यात वारे येत आहेत ज्यामुळे संपूर्ण राज्यात तापमान एक किंवा दोन अंशाने घसरण्याची शक्यता देखील आहे.

पुढील काही दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भाग कोरडेच राहतील. तथापि, २५ मार्चच्या आसपास मध्य-महाराष्ट्राच्या उत्तर-दक्षिणेकडील भागात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मध्य-महाराष्ट्रात प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूरसह काही भागांत हलका पाऊस होवू शकतो. त्यानंतर, मात्र हवामान पुन्हा कोरडे होईल.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:

मुंबई येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सियस आणि किमान 20 अंश सेल्सिअस तसेच ढगाळ आकाशासह पावसाची शक्यता देखील आहे.

[yuzo_related]

नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 35 अंश सेल्सियस आणि रात्री 16 अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते

पुणे येथे कमाल 35 अंश सेल्सियस आणि किमान 16 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे

रत्नागिरीत दिवसाचे तापमान ३१ अंश सेल्सियस आणि रात्रीचे 22 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील

वर्धामध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस असेल तर किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

अकोला येथे कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस आणि किमान 21 अंश सेल्सियस इतके राहणार आहे.

औरंगाबादमध्ये दिवसा तापमान 35 अंश सेल्सियस आणि रात्री तापमान 19 अंश सेल्सियसच्या आसपास राहील.

गरज और वर्षा वाले बादलों की ताज़ा स्थिति जानने के लिए नीचे दिए गए मैप पर क्लिक करें।

जळगावात कमाल तापमान 38 अंश सेल्सियस असेल तर किमान 20 अंश सेल्सियस अपेक्षित आहे

नागपूर येथे कमाल 37 अंश सेल्सिअस तर किमान 21 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे

 

OTHER LATEST STORIES