मागील आठवड्यात झालेल्या हलक्या पावसानंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे झाले आहे. तथापि, हे कोरडे वातावरण थोड्या काळासाठीच राहणार असून त्यानंतर मान्सून पूर्व पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे.
याचे सर्व श्रेय कमोरिन भागापासून मध्य-महाराष्ट्रापर्यंत विस्तारत असलेल्या उत्तर-दक्षिण ट्रफला जाते. पूर्वी हे क्षेत्र कमजोर झाले होते पण आता पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. परिणामी, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात २० ते २२ मार्च दरम्यान गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून तापमानात घट देखील होऊ शकते. याउलट कोकण व गोवा आणि मध्य-महाराष्ट्रात हवामान मात्र कोरडेच राहील.
सतत ढगाळ वातावरणामुळे द्राक्षे, डाळिंब, आंबा आणि भाजीपाला रोगांनी प्रभावित होऊ शकतात. तसेच आगामी पावसाच्या पार्श्वभूमीवर, शेतक-यांनी रबी पिकाची कापणी सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि योग्य उपाययोजना कराव्यात.
[yuzo_related]
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:
मुंबई येथे कमाल तापमान 32 अंश सेल्सियस आणि किमान 24 अंश सेल्सिअस तसेच ढगाळ आकाशासह पावसाची शक्यता देखील आहे.
नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 37 अंश सेल्सियस आणि रात्री 20 अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते
पुणे येथे कमाल 34 अंश सेल्सियस आणि किमान 20 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे
रत्नागिरीत दिवसाचे तापमान 33 अंश सेल्सियस आणि रात्रीचे २४ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे
वर्धामध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस असेल तर किमान २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे
अकोला येथे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस आणि किमान 23 अंश सेल्सियस इतके राहणार आहे.
गरज और वर्षा वाले बादलों की ताज़ा स्थिति जानने के लिए नीचे दिए गए मैप पर क्लिक करें।
जळगावात कमाल तापमान 38 अंश सेल्सियस असेल तर किमान 23 अंश सेल्सियस अपेक्षित आहे
नागपूर येथे कमाल 37 अंश सेल्सिअस तर किमान 21 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com