Skymet weather

[Marathi] 13 मार्च- महाराष्ट्रात पाऊस; मराठवाडा आणि विदर्भामध्ये गारपीटीची शक्यता

March 12, 2018 5:54 PM |


 

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा सामान्यपेक्षा ३ ते ४ अंशांपेक्षा अधिक आहे. तथापि, गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात आलेली असून, एक-दोन ठिकाणी तापमानात घट देखील नोंदवण्यात आलेली आहे.
 
सध्या कोमोरिन भागावर असलेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरपश्चिमीकडे सरकण्याची शक्यता असून त्यानंतर परत उत्तरेकडे वळून अरबी समुद्राकडे परत येण्याची आशा आहे.
 
[yuzo_related]

या पार्श्वभूमीवर १४ ते १६ मार्च दरम्यान मराठवाडा, विदर्भ, कोकण व गोवा तसेच मध्य-महाराष्ट्र यासह संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर मात्र पाऊस कमी होईल. शिवाय, मराठवाडा आणिविदर्भात गारपीटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. तसेच मुंबईत देखील १५ ते १६ मार्च दरम्यान पावसाची शक्यता आहे.
 
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:
मुंबईत कमाल तापमान ३८  अंश सेल्सिअस आणि किमान २३ अंश सेल्सियस राहील

नाशिक येथे दिवसाचे तापमान ३५  अंश सेल्सियस आणि रात्रीचे तपमान २०  अंश सेल्सियस नोंदवले जाण्याची शक्यता आहे

पुण्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान २० अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता आहे
 

रत्नागिरी मध्ये दिवसाचे तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि रात्री २३ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान ३६ अंश सेल्सियस, तर किमान २१ अंश सेल्सियस राहील

वर्धा येथे कमाल तापमान ३८ अंश सेल्सियस असेल तर किमान २१ अंश सेल्सियस अपेक्षित आहे

अकोला येथे कमाल ३९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सियस इतके राहणार आहे.

गरज और वर्षा वाले बादलों की ताज़ा स्थिति जानने के लिए नीचे दिए गए मैप पर क्लिक करें।Rain in India

औरंगाबाद मध्ये दिवसाचे तापमान ३६ अंश सेल्सियस आणि किमान २४ अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज आहे.
जळगावमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सियस असेल तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील.

नागपूरयेथे कमाल ३८ अंश सेल्सिअस आणि किमान २३ अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try