सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उष्ण आणि कोरडे हवामान पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उन्हाळा सदृश्य दिवस देखील अनुभवण्यात येत आहेत. खरेतर, विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा एक ते दोन अंशांहून अधिक आहे. त्याचप्रमाणे, किमान तापमान देखील सामान्यपेक्षा चार ते पाच अंशांपेक्षा अधिक आहे.
येणाऱ्या दिवसांमध्ये तापमानात कुठलाही बदल अपेक्षित नाही. तथापि, पुढील २४ तासांत विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. याउलट कोकण आणि मध्य-महाराष्ट्र हे काहीसे कमी उष्ण आहेत परंतु बऱ्याचभागांमध्ये कमाल तापमान सामन्यपेक्षा एक ते दोन अंशांनी अधिक आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासात रात्रीच्या तापमानात किंचित घट झालेली असली तरी दक्षिण मध्य- महाराष्ट्रात तापमान सामन्यपेक्षा जास्त आहे, मात्र राज्यातील उर्वरित भागांमध्ये तापमान सामान्य आहे.
[yuzo_related]
मुंबईत दिवस उष्ण आणि दमट राहील व रात्र तुलनेने आरामदायक असेल.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:
मुंबईत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान २२ अंश सेल्सियस राहील
नाशिक येथे दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सियस आणि रात्रीचे तपमान १९ अंश सेल्सियस नोंदवले जाण्याची शक्यता आहे
पुण्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान २० अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता आहे
वर्धा येथे कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस असेल तर किमान २२ अंश सेल्सियस अपेक्षित आहे
अकोला येथे कमाल ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सियस इतके राहणार आहे.
गरज और वर्षा वाले बादलों की ताज़ा स्थिति जानने के लिए नीचे दिए गए मैप पर क्लिक करें।
जळगावमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सियस असेल तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील.
नागपूरयेथे कमाल ३२ अंश सेल्सिअस आणि किमान २० अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते.
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com