[Marathi] 8 जून - महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई व नागपूरमध्ये मान्सुनपूर्व पावसाचा जोर वाढणार

June 7, 2017 10:30 PM | Skymet Weather Team

 

गेल्या २४ तासात परभणीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे, येथे ७३ मिमी. इतका पाऊस झाला. तसेच कोकण-गोवा, मराठवाडा, विदर्भात व मध्य-महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका पाऊस झाला आहे.

हवामानाच्या अंदाजानुसार पुढील २४ ते ४८ तासात नागपूरसह विदर्भात, मराठवाड्यात, मुंबईत आणि कोकण व गोवा येथे पावसात वाढ होण्याची अपेक्षा आहे. तसेच, ९ ते १२ जून दरम्यान मुंबई आणि जवळपासच्या किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे व हा पाऊस मान्सून येईपर्यंत असाच सुरू राहण्याची अपेक्षा आहे तथापि, मध्य-महाराष्ट्रात, पुणे, सांगली आणि सातारा येथे येणारे दोन-तीन दिवस पावसाचे प्रमाण खूप कमी होईल, त्यानंतर या भागात पाऊस पुन्हा सुरु होईल.

[yuzo_related]

Live status of Lightning and thunder

याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात पावसाला सुरवात होईल आणि त्याचे प्रमाण १० ते १२ जूनपर्यंत हळूहळू वाढेल.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES