[Marathi] 8 जून - महाराष्ट्रात चांगला पाऊस; येणाऱ्या दिवसांत पावसाचा जोर वाढणार

June 8, 2018 8:08 AM | Skymet Weather Team


गेल्या दिवसभरात महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला असल्यामुळे, तापमान जे ४५ अंशांच्या आसपास स्थिरावलेले होते आता ३५ अंशाच्या आसपास आलेले आहे. दरम्यान, मराठवाडा व विदर्भाच्या तुलनेत मध्य-महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण विभागात पावसाचा जोर अधिक नोंदवण्यात आला आहे.

सकाळी ८:३० वाजता संपलेल्या २४ तासात, यवतमाळमध्ये ४५ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे, तसेच मुंबईच्या कुलाबा.

वेधशाळेत ३६ मिमी, उदगीरमध्ये २४ मिमी, रत्नागिरी २० मि.मी., पुणे १९ मिमी, सोलापूर १९ मिमी, हर्णे १७ मिमी, महाबळेश्वरमध्ये १७ मिमी, वर्धा १६ मिमी, जळगाव १३ मिमी, सांगली ९ मिमी, परभणी ७ मिमी, नागपूर ६ मिमी आणि मालेगावमध्ये ४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

या पावसाच्या पार्श्वभूमीवर मध्य-महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान ३-४ अंशांनी कमी झालेले आहे.

[yuzo_related]

स्काइमेटच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकणपासून केरळ पर्यंत एक ट्रफ रेषा जात आहे तसेच मध्य-महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणास लागून एक चक्रवाती प्रणाली उपस्थित आहे. या हवामान प्रणालीमुळे आम्हाला आशा आहे की मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल व हळूहळू कोकणात देखील पावसाचा जोर वाढेल. याव्यतिरिक्त, प्रलंबीत मॉन्सूनचे पुढील २४ तासांत दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आगमन होण्याची अपेक्षा आहे.

मुंबई येथे कमाल तापमान 32 अंश सेल्सियस आणि किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 34 अंश सेल्सियस आणि रात्री 25 अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते.

कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 29 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

वर्धामध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस असेल तर किमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

जळगाव येथे कमाल तापमान 40 अंश सेल्सियस असेल तर किमान 28 अंश सेल्सियस अपेक्षित आहे.

नागपूर येथे कमाल 38 अंश सेल्सिअस तर किमान 25 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

 

OTHER LATEST STORIES