महाराष्ट्रात मान्सूनपुर्व वळवाच्या पावसाने उकाड्या पासून थोडीशी सुटका मिळाली असली तरी, सध्या विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागत पारा 40 अंश से. च्या वर जातो आहे.
गेल्या 24 तासात औरंगाबाद, रत्नागिरी, जालना, सोलापुर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी आणि मुंबईमध्ये देखील पावसाची नोंद झाली आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांत नागपूरमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे व पुण्यात देखील हलक्या सरी पडतील.
Live status of Lightning and thunder
तसेच आगामी काळात विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मेघगर्जनेसह पाऊस चालू राहील. मुंबईत देखिल पावसात वाढ होईल आणि येत्या 8 आणि 9 जून रोजी चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. हा पाऊस मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागांवर मान्सूनच्या आगमनाची नांदी ठरेल.
[yuzo_related]
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com