मागील १-२ दिवसांपासून सुरु असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील जनतेची उकाड्यापासून काही प्रमाणात सुटका झालेली आहे. गेल्या २४ तासात दक्षिण कोकण व मध्य-महाराष्ट्रात बऱ्याच तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
सकाळी ८:३० वाजता संपलेल्या २४ तासात रत्नागिरीमध्ये ११८ मि.मी., मुंबईत ५१ मि.मी., ब्रह्मपुरीमध्ये ५०
मि.मी., परभणीत ४१ मि.मी., वेंगुर्ला ३६ मि.मी., महाबळेश्वर १६ मि.मी., हर्णे १४ मि.मी., वर्धा १२ मि.मी.,अलिबाग १० मि.मी., कोल्हापूर ८ मि.मी., चंद्रपूरमध्ये २ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, आज देखील मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागात बहुतेक ठिकाणी पाऊस अपेक्षित असून पावसाचा जोर दक्षिण कोकणात अधिक
असेल. याव्यतिरिक्त, उत्तर महाराष्ट्र वविदर्भात देखील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजेच ६ जून पासून पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे दक्षिण कोकणात मॉन्सूनचे आगमन अपेक्षित आहे. यादरम्यान विशेषतः दक्षिण कोकण व लगतच्या मध्य महाराष्ट्रातील भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मुंबई येथे कमाल तापमान 33 अंश सेल्सियस आणि किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
[yuzo_related]
नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 36अंश सेल्सियस आणि रात्री 26 अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते
पुणे येथे कमाल 32 अंश सेल्सियस आणि किमान 24 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे
रत्नागिरीत दिवसाचे तापमान 30 अंश सेल्सियस आणि रात्रीचे तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे
कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 31 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील
वर्धामध्ये कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस असेल तर किमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे
अकोला येथे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस आणि किमान 27 अंश सेल्सियस इतके राहणार आहे.
औरंगाबादमध्ये दिवसा तापमान 37 अंश सेल्सियस आणि रात्री तापमान 26 अंश सेल्सियसच्या आसपास राहील.
जळगाव येथे कमाल तापमान 41 अंश सेल्सियस असेल तर किमान 29 अंश सेल्सियस अपेक्षित आहे
नागपूर येथे कमाल 38 अंश सेल्सिअस तर किमान 26 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.