[Marathi] 29 जून - कोकण व विदर्भात पावसाची शक्यता; ४८ तासांनंतर पावसाचा जोर ओसरणार

June 28, 2018 7:14 PM | Skymet Weather Team


अखेरीस मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र राज्य व्यापलेले आहे. तथापि, स्कायमेटने आधीच वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरीही, विदर्भातील काही भागांबरोबरच कोकणात पावसाची तीव्रता कायम राहिली आहे. २७ जूनपर्यंत कोकण विभागात ५२%, मराठवाडा मध्ये ४३%, मध्य-महाराष्ट्रात १९% आणि विदर्भात ४% टक्के पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
 
सध्या दक्षिण गुजरात पासून केरळ किनाऱ्यापर्यंत एक ट्रफ रेषा उपस्थित असल्यामुळे येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर, मात्र विदर्भावर पावसाची तीव्रता कमी होईल आणि मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्यावर लक्षणीय घट अपेक्षित आहे. त्यानंतरच्या ४८ तासांनंतर, महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये वातावरण कोरडे होण्याची आम्हाला आशा आहे, तथापि, काही भागांमध्ये पावसाचा लपंडाव सुरूच राहणार आहे.
 
[yuzo_related]

पुढील एक-दोन दिवसात मुंबईत एक किंवा दोन मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता असून, रत्नागिरी,वेंगुर्ला, चंद्रपूर, गोंदिया, ब्रम्हपुरी, नागपूर आणि वर्धा याशहरांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाशिम, नागपूर, अकोला, पुणे, नांदेड आणि नाशिकमध्ये येथे हलक्या सरींची शक्यता आहे.
 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:

मुंबई येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सियस आणि किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. Rain

पुणे येथे कमाल 28 अंश सेल्सियस आणि किमान 22 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे Rain

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

वर्धामध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस असेल तर किमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

नागपूर येथे कमाल 34 अंश सेल्सिअस तर किमान 25 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

 

OTHER LATEST STORIES