Skymet weather

[Marathi] 24 जून - महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, अमरावती, यवतमाळ, नाशिक मध्ये पावसाची शक्यता

June 23, 2017 6:25 PM |

 

मान्सून पुन्हा एकदा  कोकण किनारपट्टीवर सक्रीय होत असून गेल्या २४ तासात वेंगुर्ला व रत्नागिरी मध्ये हलक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

पश्चिम किनारपट्टीवर पुन्हा सक्रीय झालेल्या मान्सूनच्या लाटेमुळे बरेच दिवसांच्या विश्रांती नंतर मुंबईकरांनी चांगला पाउस अनुभवला असून, ही लाट आता केरळ पासून दक्षिण गुजरात पर्यंत विस्तारत आहे. 

[yuzo_related]

येणाऱ्या दिवसात मान्सून सक्रिय राहील, ज्यामुळे कोकण क्षेत्रात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मुंबईमध्ये गडगडाटासह मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात येत्या २४ तासात प्रामुख्याने अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर व नाशिक येथे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

Live status of Lightning and thunderlightning-in-bengaluru

मान्सूनच्या पावसाची तीव्रता पुढील 2-3 दिवसांत वाढण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील काही भागात मध्यम ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try