सध्या दक्षिण आणि मध्य कोकण व गोवा या भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच एक चक्रवाती हवामान प्रणाली दक्षिण कोकण आणि गोवा वर विकसित झालेली असून एक ट्रफ रेषा महाराष्ट्र ते केरळकिनारपट्टीपर्यंत विस्तारलेली आहे. ज्यामुळे मध्य-महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद करण्यात येत आहे. प्रामुख्याने नाशिकमध्ये २६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तसेच विदर्भात देखील पावसाचे प्रमाण वाढले आहे.
[yuzo_related]
आता, पुढील दोन ते तीन दिवस विदर्भ आणि लगतच्या मराठवाडा विभागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील २४ ते ४८ तासांमध्ये उत्तर कोंकण, गोवा आणि मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच ४८ तासांत सक्रिय मान्सूनमुळे हळूहळू महाराष्ट्रातील अनेक भागात चांगल्या पावसाला सुरुवात होणे अपेक्षित आहे.
येत्या ४८ तासांत नाशिक, अहमदनगर, पुणे, वाशिम, यवतमाळ, परभणी आणि नांदेड येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून रत्नागिरी, वेंगुर्ला, हर्णे याशहरांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. दरम्यान मुंबई, जालना आणि हिंगोली येथे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:
मुंबई येथे कमाल तापमान ३३ अंश सेल्सियस आणि किमान २6 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
पुणे येथे कमाल 29 अंश सेल्सियस आणि किमान २3 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सियस, तर किमान तापमान २2 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.
वर्धामध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस असेल तर किमान २7 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
नागपूर येथे कमाल 34 अंश सेल्सिअस तर किमान 25 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.