[Marathi] 21 जून - महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, पुणे, नाशिक व नागपूर मध्ये हलक्या पावसाची शक्यता

June 20, 2017 7:56 PM | Skymet Weather Team

 

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सूनचा जोर कमी झाल्यामुळे राज्यातील पावसाचे प्रमाण खूप कमी झाले आहे, वेंगुर्ला आणि रत्नागिरीसारख्या काही किनारपट्टीच्या भागात मध्यम पावसाची नोंद करण्यात आली आहे.

जोमदार पावसाने मुंबईकडे पाठ फिरवली असल्यामुळे गेल्या २४ तासात तुरळक पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. आमच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मान्सूनचा जोर कमी राहणार असल्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हलक्या स्वरूपाचा पाउस होण्याची शक्यता आहे.

[yuzo_related]

पुढील २४ तासात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस होण्याची शक्यता असून हवामान ढगाळ असेल आणि त्यानंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत विदर्भ व मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Live status of Lightning and thunder

दरम्यान २६ सव्हीस जूनपासून राज्यात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई आणि लगतच्या उत्तर किनारपट्टीच्या भागात २७ सत्तावीस जूनपासून जोमदार पावसाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES