[Marathi] 19 जून - मुंबई-पुणेसह, नागपूर व अकोला येथे पाऊस

June 19, 2018 10:53 AM | Skymet Weather Team

गेल्या २४ तासांत कोकण व गोव्यामध्ये जोरदार पावसाची नोंद करण्यात आलेली असून, मुंबईमध्ये देखील मध्यम ते जोरदार सरींची नोंद झालेली आहे. दरम्यान, मध्य-महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे आणि नाशिकसह काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवला गेलेला आहे. याउलट विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र तुरळक सरींची नोंद झालेली आहे.

सध्या विदर्भातील तापमान सामान्यपेक्षा २-३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असून, कोकण-गोवा आणि मराठवाड्यात मात्र सामान्यपेक्षा कमी आहेत.

[yuzo_related]

दक्षिण कोकण क्षेत्रामध्ये एक-दोन जोरदार सरींसह मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ आणि मध्य-महाराष्ट्रात विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान मुंबईसह उत्तर कोकणातील पावसाचा जोर आता कमी होईल. पण, मराठवाड्यात मात्र हवामान कोरडेच राहणे अपेक्षित आहे. मुंबई-पुणेसह, नाशिक, नागपूर व अकोला येथे पाऊस अपेक्षित, तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वेंगुर्ला, आणि अलीबाग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार.

मुंबई येथे कमाल तापमान 31 अंश सेल्सियस आणि किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 32 अंश सेल्सियस आणि रात्री 22 अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते

कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 29 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील

वर्धामध्ये कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस असेल तर किमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

जळगाव येथे कमाल तापमान 38 अंश सेल्सियस असेल तर किमान 26 अंश सेल्सियस अपेक्षित आहे

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

नागपूर येथे कमाल 38 अंश सेल्सिअस तर किमान 26 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

 

OTHER LATEST STORIES