काही काळ पावसाळा अनुभवल्यानंतर, महाराष्ट्रावरील पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि मागील दोन दिवसांपासून राज्यात काही तुरळक ठिकाणी हलक्या सरींची नोंद करण्यात आलेली आहे. किंबहुना, या पावसाचा जोर कोकण विभागातील दक्षिणेकडे अधिक होता, तर उत्तरेकडील अर्ध्या भागात हलका पाऊस नोंदवण्यात आलेला आहे. दुसरीकडे, राज्याचे उर्वरित विभाग मात्र मुख्यतः कोरडेच राहिलेले आहेत.
मागील २४ तासात, वेंगुर्ला येथे ५.२ मिलीमीटर, रत्नागिरीत २.४ मि.मी., माथेरान येथे २ मि.मी., महाबळेश्वर मध्ये १.६ मि.मी., अलीबाग येथे १.३ मि.मी., हरनाई ०.५ मि.मी. आणि सांगलीमध्ये ०.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण ते केरळ किनारपट्टीपर्यंत एक ट्रफ रेषा विस्तारत आहे व या भागावर पश्चिमेकडून वारे देखील येत आहेत. या दोन्ही हवामान प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे कोकण विभागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे.
[yuzo_related]
दरम्यान ट्रफ रेषा उत्तर कोकणाकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांत पाऊस वाढण्याची शक्यता आहे. खरेतर, येत्या २४ तासांनंतर मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. तसेच एक-दोन जोरदार सरींची शक्यता देखील नाकारता येत नाही. दरम्यान, दक्षिण कोकणात पुढील २ दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु राहणे अपेक्षित असून, महाराष्ट्राच्या उर्वरीत विभागांत तुरळक सरींची शक्यता आहे.
मुंबई येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सियस आणि किमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये दिवसाचे तापमान 34 अंश सेल्सियस आणि रात्री 26 अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते
कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 30 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील
वर्धामध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस असेल तर किमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.
जळगाव येथे कमाल तापमान 39 अंश सेल्सियस असेल तर किमान 27 अंश सेल्सियस अपेक्षित आहे
नागपूर येथे कमाल 38 अंश सेल्सिअस तर किमान 27 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.