[Marathi] 6 जुलाई - मॉन्सून महाराष्ट्रावर सक्रिय, चांगला पाऊस अपेक्षित

July 5, 2018 7:02 PM | Skymet Weather Team


महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत चांगला पाऊस नोंदवण्यात येत आहे. बुधवारी सकाळी ८:३० वाजता संपलेल्या २४ तासांच्या कालावधीत हर्णे येथे १३८ मि.मी., त्यापाठोपाठ अलिबागमध्ये ९५ मि.मी., डहाणू ८४ मि.मी., मुंबईच्या सांताक्रूज़ वेधशाळेने ४३ मि.मी. पावसाची नोंद केलेली आहे, तसेच कुलाबा ३२ मि.मी., पुणे ३१ मि.मी.,रत्नागिरी ३५ मि.मी., नागपूर २५ मि.मी. आणि वेंगुर्लामध्ये १८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
 
[yuzo_related]

स्काइमेटनुसार, कोकण विभागातील चांगल्या पावसाचे कारण उत्तर-महाराष्ट्रापासून उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत विस्तारलेली ट्रफ रेषा असू शकते. याबरोबरच, दक्षिण गुजरातवर देखील चक्रीवादळी प्रणाली उपस्थित आहे.
 
त्यामुळे कोकण विभागात तसेच मुंबई, रत्नागिरी, हर्णे, डहाणू आणि महाबळेश्वर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस चालू राहण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, मध्य-महाराष्ट्रात देखील चांगल्या पावसाची शक्यता असून, पुणे, नाशिक, मालेगाव, कोल्हापूर,सातारा याठिकाणी देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात वायव्य भागावर एक चक्रवाती प्रणाली उपस्थित असून ही प्रणाली महाराष्ट्राकडे सरकण्याची अपेक्षा असल्यामुळे पुढील २४ ते ४८ तासांत विदर्भ आणि मध्य-महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:

मुंबई येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सियस आणि किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

पुणे येथे कमाल 28 अंश सेल्सियस आणि किमान 23 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

वर्धामध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस असेल तर किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

नागपूर येथे कमाल 29 अंश सेल्सिअस तर किमान 24 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

 

OTHER LATEST STORIES