मागील काही दिवसापासून राज्यात पाऊस सुरु आहे. तथापि, या पावसाची तीव्रता कोकण आणि विदर्भातील काही भागांपर्यंत मर्यादित असून, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भाग वगळता बहुतांश भाग मात्र कोरडेच राहिलेले आहेत.
[yuzo_related]
स्कायमेटतज्ञांच्या अंदाजानुसार सध्या, एक कमकुवत ट्रफ रेषा दक्षिण महाराष्ट्रपासून लक्षद्वीप बेटांपर्यंत उपस्थित आहे. ज्यामुळे सध्या कोकणातील काही भागावर चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त,मुंबईत ४ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा असून मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
शिवाय पुढील २४-४८ तासात विदर्भातील काही भागात पाऊस अपेक्षित असून, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रमधील काही भागांवर देखील शक्यता असून पावसाचा जोर मात्र कमी राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:
मुंबई येथे कमाल तापमान 27 अंश सेल्सियस आणि किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. Rain
पुणे येथे कमाल 28 अंश सेल्सियस आणि किमान 23 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. Rain
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.
कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
वर्धामध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस असेल तर किमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
नागपूर येथे कमाल 34 अंश सेल्सिअस तर किमान 26 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.