[Marathi] 17 जुलाई - मॉन्सून महाराष्ट्रावर सक्रिय, पाऊस सुरूच राहणार

July 16, 2018 3:13 PM | Skymet Weather Team


राज्यात मॉन्सून सक्रीय आहे. तसेच मागील काही दिवसांपासून, कोकणात मुसळधार सरींसह मध्यम ते जोरदार पाऊस नोंदवला जात आहे. दरम्यान, विदर्भात आणि मध्य-महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झालेली असून, दुसरीकडे मात्र मराठवाड्यावर पावसाचा जोर तुलनेने कमी राहिलेला आहे.
 
[yuzo_related]

सोमवारी सकाळी ८:३० वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये ठाण्यात १७५ मिमी, मुंबईत ९५ मिमी, डहाणू मध्ये ८७ मिमी, गोंदिया ८६ मिमी, चंद्रपूर ५४ मिमी, वेंगुर्ला ४६ मिमी, सातारा २७ मिमी, नाशिक ३७ मिमी, ब्रह्मापुरी ३२ मिमी, कोल्हापूर २६ मिमी, बुलढाणा २१ मिमी, नागपूरमध्ये १६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
 
स्कायमेट तज्ञांच्याअनुसार पुढील २४ तासात कोकण विभागात एक-दोन जोरदार सरींसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर, उत्तर कोकणात पावसाचा जोर कमी होईल मात्र दक्षिण कोकणातील काही भागांमध्ये पाउस चालूच राहणे अपेक्षित आहे. दरम्यान विदर्भावर देखील मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तथापि मराठवाड्यावर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच राहील.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:
मुंबई येथे कमाल तापमान 28 अंश सेल्सियस आणि किमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
पुणे येथे कमाल 25 अंश सेल्सियस आणि किमान 22 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 25 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील
वर्धामध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस असेल तर किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे
नागपूर येथे कमाल 28 अंश सेल्सिअस तर किमान 23 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

 

OTHER LATEST STORIES