[Marathi] 10 जुलाई - मुंबईसह डहाणूत पावसाची संततधार सुरूच राहणार

July 9, 2018 3:36 PM | Skymet Weather Team


मागील 24 तासांत कोकणात मुसळधार पाऊस झालेला असून, विदर्भातील काही भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

सकाळी ८:३० वाजता संपलेल्या २४ तासात डहाणूमध्ये ३५४ मिमी, मुंबईतील
कुलाबा वेधशाळेने १७१ मि.मी. तर ठाणे येथे १५६ मिमी, सांताक्रूझ येथे १२२ मि.मी. तसेच विदर्भात गोंदिया येथे १०६ मिमी पावसाची नोंद केलेली आहे.

[yuzo_related]

स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील तीन-चार दिवस कोकणात मुख्यतः उत्तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील २४-४८ तासात विदर्भात काही भागांत जोरदार पाऊस होऊ शकतो. दरम्यान,मध्य-महाराष्ट्रातील काही भाग देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस अनुभवू शकतात. याउलट, मराठवाड्यावर मात्र पाऊस तुलनेने कमी असेल.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी तापमान अंदाज बघूया:

मुंबई येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सियस आणि किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. Rain

पुणे येथे कमाल 27 अंश सेल्सियस आणि किमान 23 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे Rain

कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 26 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

वर्धामध्ये ढगाळ वातावरणासह कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस असेल तर किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

नागपूर येथे कमाल 30 अंश सेल्सिअस तर किमान 22 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.

 

OTHER LATEST STORIES