कोकण-गोवा व विदर्भातील काही भागांमध्ये मान्सूनने वेग घेतला आहे. याउलट विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचे अनेक भाग अजूनही चांगल्या पावसापासून वंचित आहेत.
पुढील तीन-चार दिवसांत उत्तर कोकण व गोवा येथे मान्सूनच्या पावसाचा जोर कमी होईल परंतु दक्षिण कोकण व गोव्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता नाकारता येत नाही .
[yuzo_related]
मुंबई, रायगड आणि डहाणूसारख्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे व येत्या काही दिवसांत सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर आणि नाशिक येथे हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
Live status of Lightning and thunder
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात तीन-चार दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असून येत्या ११ जुलैपासून किनारी भागात व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com