गोवा, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि विदर्भात मान्सून ने चांगलाच जोर पकडला आहे. याचा परिणाम म्हणून या भागात गेले काही दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होतो आहे.
सध्या सक्रिय असलेल्या मान्सून प्रणालीमुळे पुढील अठ्ठेचाळीस तासात कोकण व गोव्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होवू शकतो त्याच बरोबर विदर्भात मात्र पुढील चोवीस तास पावसाची उघडझाप सुरु राहील.
[yuzo_related]
येत्या दोन ते तीन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल. असे असले तरी त्या भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
Live status of Lightning and thunder
पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात मुंबई, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवरील काही भागात मुसळधार पाऊस देखील होवू शकतो.
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com