[Marathi] 28 जुलै - महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, पुणे येथे हलक्या सरी; नागपूर, औरंगाबाद, परभणी येथे उघडीप

July 27, 2017 6:08 PM | Skymet Weather Team

 

मान्सूनचा जोर महाराष्ट्रात कमी झाला असून, पुढील काही दिवसांत मान्सूनची गती वाढण्याची शक्यता नाही.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्राजवळच्या भागात मान्सूनकरिता उपयुक्त हवामान प्रणालीच्या अभावामुळे येत्या काही दिवसात राज्यात कोरड्या हवामानाची नोंद होण्याची शक्यता आहे.

तथापि, कोकण व गोवा विभागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु राहण्याची अपेक्षा आहे. याउलट मुंबई मध्ये एक दोन सरींची अपेक्षा असून हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

[yuzo_related]

पुढील 24 तासांत, मध्य-पूर्व राजस्थानमधील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे उत्तर मध्य-महाराष्ट्रातील काही भागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने जळगाव, धुळे, नाशिक आणि मालेगाव याठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता

तसेच पुणे आणि आजूबाजूच्या भागात देखील एक दोन सरी पडण्याची शक्यता आहे, मात्र नागपूर, जालना, औरंगाबाद, नांदेड आणि परभणी येथे हवामान कोरडे राहिल.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES