कोंकण किनारपट्टीसह मध्य-महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे। या भागांतील काही मोजक्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे। गेल्या २४ तासात विदर्भात मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला आहे। याउलट मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर खूपच कमी आहे।
येत्या ४८ तासात विदर्भ आणि कोकण व गोवा विभागात चांगला पाऊस पडेल। प्रामुख्याने नागपूर, डहाणू, अमरावती, गोंदिया, नाशिक, मुंबई आणि रत्नागिरी या शहरांमध्ये देखील चांगल्या पावसाची अपेक्षा आहे।
[yuzo_related]
पुढील २४ तासांनंतर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील हवामान जवळपास कोरडे राहण्याची शक्यता आहे पण हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही।
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com