[Marathi] 22 जुलै - महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, रत्नागिरी, डहाणू येथे चांगला पाउस; 48 तासांनंतर जोर कमी होणार

July 21, 2017 5:45 PM | Skymet Weather Team

 

गेल्या अनेक दिवसांपासून मान्सून कोंकण किनारपट्टीवर आणि विदर्भातील अनेक भागांवर सक्रिय आहे। परंतु आता, महाराष्ट्रात पावसाची तीव्रता पुढील काही दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे। पुणे, मुंबई, अलिबाग, डहाणू, हर्णे आणि रत्नागिरीसह कोंकण आणि गोवा विभागातील अनेक भागांत मान्सूनच्या चांगल्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही।

दरम्यान, पुढील २४ तासांत पुणे, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा आणि सोलापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाउस सुरूच राहील अशी अपेक्षा आहे। 

[yuzo_related]

तथापि, नागपूर, गोंदिया आणि अमरावती येथे थोड्या कालावधीसाठी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस होईल आणि त्यानंतर या भागात पावसाचा जोर कमी होईल। तसेच, २४ ते ४८ तासांनंतर मध्य-महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाची तीव्रता कमी होईल।

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES