मान्सूनचे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जोरदार पुनरागमन झालेले असून, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय आहे. ज्यामुळे डहाणू, अलिबाग आणि मुंबईत मुसळधार पाउस झालेला आहे तसेच नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि परभणी या सारख्या ठिकाणी गेल्या २४ तासांत मध्यम ते जोरदार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाकरिता हवामान पूरक आहे. ज्यामुळे पुढील तीन-चार दिवसांत विदर्भ आणि मराठवाडा येथे एक किंवा दोन मुसळधार सरींसह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाउस अपेक्षित आहे. मात्र मध्य-महाराष्ट्रात पाउस विखुरलेला असेल.
[yuzo_related]
दरम्यान, मुंबईसह कोकण व गोवा विभागातील बहुतांश भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
पुढील २४ ते ४८ तासांत, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात हलक्या सरी अपेक्षित आहेत व अकोला, परभणी, मुंबई, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com