महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सून सक्रिय झाल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील किनारी भागांवर हलक्या ते मध्यम पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत देखील चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत नाशिक, ठाणे, हर्णे, पुणे आणि डहाणू या सारख्या काही ठिकाणी जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे व मुंबईकरांची शुक्रवारची पहाट सुद्धा पावसाने झाली.
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाडा विभागात बहुतेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाउस होत आहे परंतु येत्या दोन ते तीन दिवसांनंतर या भागांवरील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
[yuzo_related]
तथापि किनारपट्टी व मध्य महाराष्ट्रावर मान्सून सक्रिय राहील ज्यामुळे पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांत मालेगाव, नाशिक, डहाणू आणि ठाणे येथे चांगला पाउस होण्याची शक्यता आहे, तसेच मुंबईवर देखील हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com