मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि विदर्भातील काही भागांवर सक्रीय असून त्यामुळे हर्णे, रत्नागिरी आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाउस सुरू राहील.
पुढील 24 ते 48 तासांत गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, अहमदनगर, जळगाव आणि औरंगाबाद याठिकाणी चांगला पाउस अपेक्षित आहे.
[yuzo_related]
दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांत पाउस पडण्याची शक्यता आहे आणि सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरसारख्या ठिकाणी हलक्या सरी पडतील.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
येत्या 48 तासांनंतर महाराष्ट्रावर मान्सूनच्या पावसाची तीव्रता वाढण्याची अपेक्षा असून यामुळे डहाणू, रायगड आणि मुंबई यांसारख्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com