Skymet weather

[Marathi] 18 फेब्रुवारी- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, नागपूर, नाशिकमध्ये उष्ण हवामान; ज्वारी, गहू, हरभरा कापणीला सुरुवात

February 17, 2018 10:11 PM |


 

पाऊस आणि गारपिटीच्या घटना झाल्यानंतर कोरड्या हवामानाने पुन्हा महाराष्ट्रावर आपली पकड मजबूत केली आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि कोकणातील सर्व उपविभागांमध्ये तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे. मात्र तापमानात जास्त चढ-उतार अपेक्षित नसून पुढील ४८ तास हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे.

या हवामानाचा पिकांवर विपरीत परिणाम होत असल्यास, शेतक-यांना सल्ला दिला जातो की कीटकांचा उपद्रव टाळण्यासाठी उचित पावले उचलावीत तसेच पिकाला आवश्यकतेनुसार सिंचन द्यावे. शिवाय, ज्वारी, हरभरा व गहू या पिकांची कापणी पूर्ण करून उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:

मुंबईत, तापमान उष्ण असण्याची शक्यता असून, कमाल तापमान ३६ अंश से. आणि किमान १९ अंश से. असण्याची शक्यता आहे.

[yuzo_related]

नाशिकमध्ये कमाल ३१ अंश सेल्सिअस आणि किमान १५ अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे.

पुणे येथे हवामान थंड असण्याची शक्यता असून, कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १३ अंश सेल्सियस राहण्याची अपेक्षा आहे.

रत्नागिरी येथे हवामान सुखद असण्याची शक्यता असून, कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर येथे निरभ्र आकाशासह कमाल तापमान ३१ अंश सेल्सियस आणि किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

वर्धा येथे हवामान उबदार असण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

अकोला येथे निरभ्र आकाशासह दिवसा तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

औरंगाबादमध्ये हवामान उष्ण राहण्याची शक्यता असून कमाल तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

गरज और वर्षा वाले बादलों की ताज़ा स्थिति जानने के लिए नीचे दिए गए मैप पर क्लिक करें।Rain in India

जळगाव येथे देखील कमाल तापमान ३२ अंश से. आणि किमान तापमान १५ अंश से. राहण्याची अपेक्षा आहे

नागपूरमध्ये हवामान उष्ण असण्याची शक्यता असून, दिवसा तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try