[Marathi] 6 डिसेंबर- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत विक्रमी पाऊस, आज पण संततधार अपेक्षित

December 5, 2017 2:39 PM | Skymet Weather Team


 
गेल्या बऱ्याच दिवसांपासून मुंबईचे हवामान ब-यापैकी कोरडे होते. पण ओखी चक्रीवादळाने केरळ व कर्नाटकात थैमान घातल्यानंतर आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवलेला असून सद्यस्थितीत ओखी चाक्रीवादळाची तीव्रता थोडी कमी झालेली असून मुंबई पासून साधारण 230 किमी दूर असून सुरत पासून 390 किमी दूर आहे. ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत काल संध्याकाळ

पासूनच पावसाला सुरुवात झालेली असून, पावसाचा जोर आज सकाळ पासून वाढलेला आहे. आज सकाळी ५:३० ते ८:३० यादरम्यान मुंबईत ११ मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

तसेच गेल्या २४ तासात सांताक्रूझ वेधशाळेने २२ मिमी व कोलाबा वेधशाळेने २३ मिमी पावसाची नोंद केलेली आहे. या पावसामुळे मुंबईचा डिसेंबर महीन्यातील पावसाचा विक्रम मोडीत निघाला आहे.

[yuzo_related]

सद्यपरिस्थिती पाहता मुंबई आज दिवसभर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित असून, एक-दोन जोरदार सरींची शक्यता देखील नाकारता येत नाही.

वाऱ्याचा वेग साधारण ४० ते ५०किमी प्रती तास इतका राहील. दरम्यान, कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने अलीबाग, डहाणू व मध्य- महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील हलक्या सरींची शक्यता आहे.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता

उद्या पासून मात्र पावसाचा जोर कमी होईल, तसेच चक्रीवादळाची तीव्रता देखील कमी होणे अपेक्षित आहे. चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने प्रवास करणार असल्याने महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर पावसाची उद्या देखील शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्याने नंदुरबार, धुळे, जळगाव येथे हलका पाउस अपेक्षित आहे.

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES