[Marathi] 5 डिसेंबर- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: चक्रीवादळ ओखी देणार मुंबई, डहाणू, रायगढ़, ठाणे, जळगाव येथे पाऊस

December 4, 2017 4:09 PM | Skymet Weather Team


 

चक्रीवादळ ओखी मुंबईपासून दक्षिण नैऋत्येस ६९० किमी आणि सूरतपासून ८७० किमी दक्षिण स्थित आहे. पुढील सहा ते आठ तासात ही प्रणाली उत्तर-वायव्य दिशेने वाटचाल करणार असून त्यानंतर गुजरातच्या उत्तर ईशान्य दिशेने सरकणार आहे.

चक्रीवादळ ओखीच्या प्रभावामुळे कोकण आणि गोवा येथे अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान आहे. तसेच मुंबईसह, रायगड, ठाणे, डहाणू, नंदुरबार, धुळे व जळगाव येथे आज रात्रीपर्यंत हलक्या पावसाला सुरूवात होईल. मात्र, ५ डिसेंबर रोजी चक्रीवादळ ओखीची तीव्रता कमी होईल. या काळात उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

[yuzo_related]

चक्रीवादळ ओखीच्या प्रभावामुळे ५ आणि ६ डिसेंबर रोजी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून समुद्र देखील खवळलेला असू शकतो. या काळात वाऱ्याचा जोर ताशी ४० ते ५० किलोमिटरपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

पावसाचा जोर जास्त नसल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही, असे असले तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व समुद्रात जावू नये. तसेच या काळात मच्छिमार बांधवांनी देखील मासेमारीसाठी खोल समुद्रात जाणे टाळावे.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता

Rain In Mumbai

त्यानंतर, ही हवामान प्रणाली गुजरातमध्ये प्रवेश करेल आणि वादळाचा जोर कमी होईल व हवामान पुन्हा एकदा कोरडे होईल.

 

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

OTHER LATEST STORIES