21 डिसेंबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज: महराष्ट्रात किमान तापमान समान्यपेक्षा कमी; काही ठिकाणी धुक्याची शक्यता

December 20, 2018 7:01 PM | Skymet Weather Team


सम्पूर्ण महाराष्ट्रात अजूनही कोरडे हवामान चालू आहे। तसेच गेल्या 24 तासात बर्यांच भागातील किमान तापमानात लक्षणीय घट आली आहे।

मध्य महाराष्ट्रातील, अहमदनगरमध्ये सगळ्यात कमी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे, येथे किमान तापमान 6 अंशचा आसपास नोंदवण्यात आलेले आहे।

मराठवाडयात देखील औरंगाबाद येथे किमान तापमान 8 अंश, इतके नोंदवले गेले आहे। याशिवाय परभणीत किमान तापमान समान्यपेक्षा 3 अंशनी कमी आहे।

तसेच, नागपुरमध्ये किमान तापमान 9 अंशचा जवळपास नोंदवले गेले आहे, जे समान्यपेक्षा 4 अंशनी कमी आहे। तसेच, दूसरीकडे, मुंबईसह , कोंकणात आणि डहाणूमध्ये किमान तापमान 15 अंशापर्येन्त पोहोचले आहे, ज्यामुळे या भागांमध्ये थंडी अनुभवण्यात येत आहे।

दरम्यान, एक ट्रफ रेशा दक्षिण-पूर्व अरब सागरपासून तेलंगाणापर्येन्त विसतरलेली आहे। तसेच, येणार्या दिवसात एक अजून ट्रफ रेशा विदर्भावर विकसित होणार आहे ज्यामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपच्या धुकयाची शक्यता आहे।

आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:

मुंबईत कमाल तापमान 33 अंश से. आणि किमान 22 अंश से. असण्याची शक्यता आहे.

मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.

नाशिक मध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि किमान 20 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

वर्धा येथे कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

नागपूर येथे दिवसा तापमान सुमारे 28 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 13 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

 

OTHER LATEST STORIES