मागील 2- 3 दिवसांपासुन, विदर्भात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। या शिवाय, छत्तीसगढ़पासून कर्नाटकपर्येन्त विसतरलेल्या ट्रफ रेषेमुळे मराठवड्यात देखील पाऊस झाला आहे। तसेच, आज आणि उद्या देखील हा पाऊस कायम राहील, अशी अपेक्षा आहे।
त्यानंतर, मात्र हवामान पुन्हा एकदा कोरडे होईल।
दरम्यान, एक कमी दाबचा पट्टा बंगालच्या उपसागरावर असून, येणार्या दिवसात आंध्र प्रदेश पर्येन्त पोहोच्ण्याची शक्यता आहे ज्यामुळे विदर्भ आणि मराठवाडयात 16 व 17 डिसेंबरच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे।
दूसरीकडे, मध्य महाराष्ट्र आणि कोंकण व गोव्यावर हवामान कोर्डेच राहील।
मागील 24 तासात, सम्पूर्ण महाराष्ट्रात किमान तापमानात 2 ते 3 अंशनी घट दिसून आलेली आहे। । दरम्यान येणार्या दिवसात, विदर्भात किमान तापमान 9 ते 12 अंशाचा आसपास राहील आणि वातावरणात थंडावा पसरेल। तसेच मुंबईसह मध्य महाराष्ट्रात देखील थंडी अनुभवण्यात येईल ।
आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:
मुंबईत कमाल तापमान 30 अंश से. आणि किमान 22 अंश से. असण्याची शक्यता आहे.
नाशिक मध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान 16 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.
मेघगर्जना आणि पावसाची सद्यस्थिती करिता खाली दिलेल्या नकाशावर क्लिक करा.
वर्धा येथे कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.
नागपूर येथे दिवसा तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 18 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.